लेख क्र. २ बाप
बाप म्हणजे काय? आपल्या आयुष्याला आधार, नवीन वळण देण्याचं काम करणारा एक वेक्ती ज्याच
सर्वास आपण आहो.
आयुष्यातील सर्वातील मोठी वक्ती जी आपल्या आयुष्यात नसेल, ना तर आपली आयुष्यात कशाची
तरी कमतरता आहे, हे आपल्याला कळते. आयुष्यातील अशी वेक्ती जी शब्दात सांगता येत नाही. ज्या ठिकाणी बाप हा
शब्द लागतो ना तेव्हा आपल्याला आयुष्याला आधार देणाऱ्या वेक्तीची आठवण होते.
जगातील सर्व लेखांनी आईच्या बाबतीत लिहिले आहे, का? असं कोणालाच प्रश्न नाही पडला असेल
का? की सर्व लेखकांनी आई विषयी लिहिले आहे. बापा विषयी का नाही लिहिलं. त्याला पण काही कारण आहे? असं की आई
दिवस भर घरात असते. दिवस भर आपल्या मागे पुढे करत असते. त्या मुळे आई ही सर्वांनाच जवळची वाटते. बाप दिवस भर
बाहेर राहतो. काम कुठ, कस काम मिळेल व किती पैशे भेटतील याच्या शोधत, तो दिवस भर बाहेर असतो आणि कदाचित याच
कारण पाई मुलं आपल्या बापाला विसरता. पण त्यांना कोण सांगणार, तो आहे म्हणून तुमचं घर चालत आहे. दिवस भर
बाहेर राहून तो काम करून घरी येतो आणि त्याला असं खूप वाटत की मुलांशी बोलावं. पण, तो येई पर्यंत मुलं झोपले
असतात आणि जेव्हा तो कामाला जातो तेव्हा ही मुलं झोपलेले असता. पण त्याला पण ते ही तेवढंच गरजेचं असत. तो जर
कामाला नाही गेला, तर त्याला माहित आहे की, त्याच्या मुलांना उपाशी झोपाव लागेल. त्या मुळे तो रोज सकाळी
उठून कामाला जातो आणि फक्त घरी आईच असते, म्हणून त्या मुलांना आईच जवळची वाटते. बाप आपल्या मुलानं साठी खूप
काही करत असतो. मुलांना बापने केलेल्या कष्टाची जानच नसते. पण अस ही आहे, की हे सर्वांच्याच बापतीत नसत.
त्यांना वाटत की बाप दिवस भर बाहेर, काही काम नसेल करत. पण आपल्या आयुष्यात सर्वात जास्त कष्ट फक्त घेणारी
वेक्ती म्हणजे आपला बाप. आपल्या आयुष्यात बापा येवढे कष्ट कोणीच नाही घेत. आपल्या मुलांच्या पालन पोषणाची
काळजी एवढी असते ना, त्याचा मागे की तो आपले उरलेले जीवन विसरून फक्त मुलांना संभाळण्यात घालवतो. आपल्या
बापाला आपले मुलं कधीच बोजा नसता. त्यांच्या साठी ते त्यांच्या ओजळीत पडलेली फुले असतात. की ती त्यांना न
कोमेजता सांभाळायची असतात.
बाप, पापा, बाबा, पप्पा, वडील, ड्याड, अशे अनेक नाव पण या सर्वांचे उत्तर मात्र एकच
आधार. लोक म्हणता की आई आहे, म्हणून घराला घरपण आहे, पण मला अस वाटत की, बाप आहे. म्हणून घराला घर पण आहे.
असं नाही की आई घरा साठी काहीच नाही करत, पण जेवढं कष्ट बाप करतो ना, ते अतुलनीय असते. आपल्या आयुष्यातील
सर्वात महत्वाची वेक्ति म्हणजे आपला आई-बाप. या जगात आई-बापा येवढं प्रेम कोणीच नाही करत. आपल्या आई-बापा
येवढ प्रेम या जगात कोणी केलं ही नाही आणि करणार ही नाही. या जगात सर्व फक्त आपल्या स्वार्थ साठी प्रेम
करता. फक्त आई-वडीलच निस्वार्थ प्रेम करता.
बापाचं एक वैशिष्ट हे ही आहे. की, तो दूनियातील कोणतेही दुःख पाचवण्याच सामर्थ्य ठेवतो.
बाप हा शब्द दुःख सामावून घेण्यासाठी तयार झाला आहे, अस मला तरी वाटत. आयुष्यात या शब्दाचे खूप महत्त्व आहे,
आस मला तरी वाटत. कारण माझ्या आयुष्यात या शब्दाला तर खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही एक गोष्टी वर लक्ष वेधले
असेल की, ज्याच्या घरात तरुण मुलगा मारतो. त्या ठिकाणी आईला जास्त दुःख होतो आणि ती ते रडून दाखवते. पण त्या
घरातील बाप शक्यतो रडतो. का? असा प्रश्न आपल्या कधी पडला नाही का? कारण देवाने त्याला त्याच्या आयुष्यात
सर्व संकटांना सामोरे जाण्याची ताकद दिली असते आणि तो रडला तर कुटुंबाला आधार देण्याचं काम कोण करेल. आई तर
रडून मोकळी होते. पण बापाच काय? तो रडला तर कुटुंब संपूर्ण पणे भरकटते.
आपण कधी असा विचार सुद्धा करू शकत नाही, की बापा शिवाय आपले जीवन
आनंदी होईल. असा विचार करून बघितला तर किती भयानक वाटत. बापा शिवाय आपले आयुष्य शून्य आहे. बाप हा शब्द
नुसता आपल्या तोंडातून बाहेर पडला तर, आधार देऊ जातो, जीवनातील संकट दूर करून जातो. आनंदाच्या क्षणाला
संपुर्ण घर जात, पण मैताच्या ठिकाणी फक्त बापच जातो का? दुःख पाचवण्यची ताकद असलेला माणूस म्हणजे आपला बाप.
आपण कुठे तरी पडलो किंवा कुठे तरी खरचटले तर आपल्या तोंडातून ‘आई’ हा शब्द
येतो, पण त्याच ठिकाणी एखाद्या गाडीने जोरात ब्रेक दाबला तर आपल्या तोंडातून ‘बापरे’ हा शब्द येतो, अस का
याचा विचार केला आहे. कारण छोट्या-छोट्या संकटाना आई चालते, ओ पण मोठी-मोठी वादळे पेलताना बापच लागतो.
‘काय बोलावं या वेक्ती साठी कितीही बोलल तरी कमीच आहे.’
जाता जाता येवढच सांगतो. की आई बापाचे उपकार तर नाही म्हणता येतील, कारण ते त्यांचे कर्तव्य होते त्याने ते
केला. आता आपले कर्तव्य आहे की, आपण आता त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करू.